December 11, 2011

भारतीय सार्वजनिक स्वच्छता गृह - भारताची काळी बाजु

भारताबाहेर राहतांना तिथल्या मेडीयामध्ये आपल्या देशाबद्दल कुठलीही बातमी असेल तर त्यावर पहिली नजर जाणे साहजिकच असते. सिंगापूरला भारतीय खूप दिसत असलेत तरी भारताबद्दल सहसा काही बातमी वाचायला मिळणे तसे कठीणच. अधुनमधुन  आपल्या देशाच्या आर्थिक प्रगतीबद्दल छापून येते त्यावेळी आपण मान ताठ करून चालावे  असे वाटू लागते. पण गेल्या काही दिवसात मात्र कॉमनवेल्थ गेम्सच्या वेळी वापरण्यात आलेली स्वच्छतागृहे वर्तमानपत्रात छापून येताय आणि यावेळी मात्र भारतीयानी  नजर चुकवावी अशी ती बातमी आहे .  अतिशय अन किळसवाणे असे बाथरूम्स , पाण्याचे  थारोळे, तंबाखू अन पानाच्या पिंकानी सजलेले स्वच्छतागृहे बघून बाहेरदेशातील लोकांनाच काय पण आपण भारतीय असूनही आपल्यालाही चीड येईल .

आपल्या देशातील गलिच्छ स्वच्छतागृहे ही काही आजची बाब नाही. वर्षानुवर्षे हेच तर पाहत आलोय आपण. त्यामुळेच आपली नजरही मेली आहे . हे सगळे असेच चालायचे म्हणून आपण सोडून देतो. पण जेव्हा अशा प्रकारच्या गोष्टी बाहेरदेशात आपल्याला वाचायला मिळतात तेव्हा लाज वाटण्या खेरीज अजून काय करता येईल याचा विचार नक्कीच  मनात येतो.


0 comments: